Vidarbha - Hidden Treasure - Page 3 - SkyscraperCity
 

forums map | news magazine | posting guidelines

Go Back   SkyscraperCity > Asian Forums > India > West > West/Central India Projects > Maharashtra > Nagpur


Global Announcement

As a general reminder, please respect others and respect copyrights. Go here to familiarize yourself with our posting policy.


Reply

 
Thread Tools
Old March 30th, 2013, 04:46 AM   #41
_GrapeWine_
Registered User
 
_GrapeWine_'s Avatar
 
Join Date: Jul 2008
Location: I.N.D.I.A
Posts: 1,606
Likes (Received): 419

3000-year-old tribal colony discovered in Vidarbha region

Vinita Chaturvedi, TNN | Mar 30, 2013, 12.00 AM IST

Quote:
Move over Harappa and Mohenjodaro! Vidarbha can now boast of its own important archaeological landmark at Mali, in Tiroda Taluka, at Gondia district, where remains of a 3000-year-old tribal colony of Megalithic age have recently been discovered. If all goes well, this could open new vistas for History lovers and put Vidarbha on the archaeological map as a major attraction, says assistant director of archaeology, Nagpur region, Dr Madhukar Kathane.


An important discovery
The work on this archaeological expedition started in January this year, says Dr Kathane, and adds: "The archaeologists of Maharashtra are quite thrilled with the discovery of this tribal colony. We have found the utensils, everyday weapons, pottery and even a harpoon at this site. The Megalithic inhabitants of this colony were tribals, whereas the inhabitants of Harappa and Mohenjodaro were essentially urban people. Soon, we will get more insights into the lifestyle of megalithic people.

Attracting tourists
According to Dr Kathane, if this site is promoted well, it could give a fillip to tourism in the region, which lacks an incentive. "Close to Mali, we had also discovered the site of an ancient temple at Nagra sometime back, which dates back to 8th century AD. And it is very close to Nagzira, which is a major jungle attraction of the region. If these three destinations are clubbed together and sold as a package, they could become a major attraction for holidaymakers, especially the foreign tourists," says Dr Kathane.
__________________
INDIA RisiNg...
flickr --- 500px
_GrapeWine_ no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 
Old April 30th, 2013, 06:03 PM   #42
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old May 19th, 2013, 10:57 AM   #43
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 
Old May 25th, 2013, 11:07 AM   #44
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old May 26th, 2013, 03:54 PM   #45
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old May 26th, 2013, 03:55 PM   #46
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old June 20th, 2013, 06:50 AM   #47
nagpuri_punter
Registered User
 
nagpuri_punter's Avatar
 
Join Date: Jul 2012
Location: Nagpur/Pune
Posts: 632
Likes (Received): 78

__________________
.
Legend Never Dies ..!!


$$======================$$
~~ Mechanical Engineers Made The world ~~
nagpuri_punter no está en línea   Reply With Quote
Old June 27th, 2013, 08:14 AM   #48
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

MTDC च्या उदासीनतेची झळ सोसतेय चिखलदरा
Jun 25, 2013, 01.30AM IST
म . टा . प्रतिनिधी , नागपूर

पावसाची ' एन्ट्री ' आणि उकाड्याची ' एक्झिट ' झाली . अशावेळी पर्यटकांचा ओढा साहजिकच पावसाळी पर्यटनाकडे वळला आहे . पाऊस ' एन्जॉय ' करण्यासाठी विदर्भाचे महाबळेश्वर असलेले चिखलदरा अन् आणखी काही स्थळे आहेत . मात्र , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ( एमटीडीसी ) या पर्यटनस्थळांप्रती असलेली उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे . एमटीडीसीच्या पावसाळी पर्यटनविषयक जाहिरातीत सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या चिखलदऱ्याची नोंदच नाही . शिवाय , या परिसरातील धबधब्याची ठिकाणेही विकसित करण्यात आलेली नाहीत . त्यामुळे चिखलदरा या विदर्भातील नंदनवनाविषयीचा दुजाभाव दिसून आला आहे .

महाबळेश्वर , माथेरान , लोणावळा , चिपळूण , इगतपुरी , भंडारदरा , अंबोली अशी पर्यटनस्थळे या यादीत आहेत . पावसाळ्यात उंच कड्यांवरुन झेपावणाऱ्या धारांमध्ये आणि धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक अशा पर्यटनस्थळी गर्दी करत असतात . चिखलदरा , मुक्तागिरी , मेळघाटच्या पायथ्याशी गुल्लरघाट रस्त्यावर असलेला सूर्या धबधबा , धारखोरा किंवा चिंचाळी या धबधब्यापर्यंत अजूनही पर्यटक सहजासहजी पोहचू शकत नाहीत . त्यामुळे चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधब्यावर पर्यटकांची अधिक गर्दी होते . अकोट ते हरिसाल मार्गावर पावसाळ्यात मनसोक्त निसर्ग अनुभवता येतो , पण त्यासाठी पर्यटकांना प्रत्येक टप्प्यावर अडचणीचा सामना करावा लागतो . अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून चिखलदरा मार्गावरील बुरडघाट फाट्यापासून पाच किलोमीटर जंगलातून पायी गेल्यावर धारखोरा हा नयनरम्य धबधबा आहे , पण तोही दुर्लक्षित आहे . या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यातही या धबधब्यातून पाणी ओसंडत असते . मात्र , अनेक पर्यटकांना या धबधब्याविषयी माहितीच नाही . सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला चिचाटीच्या धबधब्यावरसुद्धा पायी मार्गक्रमण करून पोहोचावे लागते . ३०० फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो . धारणी तालुक्यातील राणीगाव कंजोलीचा धबधबादेखील दुर्गम भागातच आहे . अमरावती जिल्ह्यातच असंख्य पावसाळी पर्यटनाची स्थळे आहेत , पण विकासाअभावी ती दुर्लक्षित आहेत . याव्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंडचा धबधबा असो किंवा गोंदिया जिल्ह्यातील ढासगड किंवा दरेकसाजवळील हाजरा फॉल , अशी असंख्य धबधबे असणारी पावसाळी पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावत असतात . मात्र , ही स्थळे विकसित करण्याऐवजी राज्यातील इतर भागातच पर्यटन विभागाचे अधिक लक्ष आहे .

भारतातून हजारो पर्यटक वर्षभर चिखलदऱ्यात येतात . विशेषकरून पावसाळ्यात ही संख्या अधिक आहे . केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश , छत्तीसगडच्या पर्यटकांचा कल चिखलदऱ्याकडे आहे . असे विविध धबधबे असणाऱ्या पावसाळी पर्यटनस्थळांचा विकास आणि त्याचे योग्य मार्केटिंग करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अपयशी ठरल्याची पर्यटनप्रेमींची भावना आहे .
radioactive no está en línea   Reply With Quote
Old July 6th, 2013, 11:14 AM   #49
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

कोका अभयारण्य ठरणार भंडा-यासाठी पर्वणी
Jul 4, 2013, 01.30AM IST

म . टा . प्रतिनिधी , भंडारा

भंडा - यातील वन्यजीव अभयारण्याची उणीव नुकत्याच घोषित झालेल्या कोका अभयारण्यमुळे भरून निघणार आहे . शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरवर वन्यजीव प्रेमिंना सहजपणे व्याघ्रदर्शन घेणे शक्य होणार आहे . त्यामुळे अभ्यासकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे . नागझिरा अभयारण्याला लागून ९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे .

१९९९ पर्यंत गोंदिया भंडारा जिल्ह्याचाच भाग होता . त्यानंतर भंडाऱ्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा स्थापन झाला . नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे विभाजनानंतर गोंदियात गेल्याने भंडारा जिल्हा अभयारण्याविना होता . ही उणीव कोका अभयारण्यामुळे भरून निघणार आहे .

नागझिरा अभयारण्याला लागूनच कोका अभयारण्य असल्याने येथे व्याघ्रदर्शनही शक्य आहे . वन्यजीवांसाठी पाण्याची सोयही बऱ्यापैकी उपलब्ध आहे . अभयारण्यात नऊ लघुसिंचन तलाव आहेत . नैसर्गिक पाणवठेही आहेत . बारमाही पाणी उपलब्ध असल्यामुळे या अभयारण्यातून वन्यजीवांचे स्थलांतर होण्याची शक्यताही कमीच आहे .

मानवी हस्तक्षेप नाही

कोकाचे तापमान उन्हाळ्यात ४२ अशांपर्यंत राहते . हे एकमेव अभयारण्य आहे की , ज्यात लोकवस्ती किंवा कोणतेही गाव नाही . अभयारण्याच्या हद्दीत केवळ बुंदेलघाट हे एकमेव गाव आहे . परंतु तेथे लोकवस्ती नाही .

कोकाची वनसंपदा

२०१३ मध्ये झालेल्या गणनेत येथे बऱ्यापैकी वन्यजीवांची नोंद झाली आहे . तीन मोठे वाघ , सहा बिबट , १३ अस्वल , ५१ रानडुक्कर , २८ रानम्हशी , ३५ सांबर , १३९ चितळ , ९ कोल्हे , २९ रानकुत्री , २४ नीलगायी , ८ मोर आणि ५ बार्किंग डियर आढळले .

जाण्यासाठी मार्ग

शहरापासून १५ किलोमीटरवर डोडमाझी येथून अभयारण्यात प्रवेश करता येईल . याच अभयारण्यातून नवीन नागझिरा आणि नागझिरा अभयारण्यात सुद्धा जाता येते .
radioactive no está en línea   Reply With Quote
Old July 22nd, 2013, 08:02 PM   #50
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old July 24th, 2013, 06:35 PM   #51
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 5th, 2013, 05:55 PM   #52
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 7th, 2013, 07:30 AM   #53
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

ज्यांनी वसविले नागपूर, ते राहतात तरी कुठे?Aug 6, 2013, 12.18AM IST
अविनाश महालक्ष्मे नागपूर

ज्या राजाने नागपूर शहराची निर्मिती करून त्या शहराला पहिल्यांदा राजधानीचा दर्जा दिला, त्या गोंड राजे बख्त बुलंद शहा यांचा महालातील किल्लाच आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गात झालेले अतिक्रमण, त्यामुळे आकुंचन पावलेला राजमार्ग पाहून हा रस्ता राजमहालात जातो, असेही कुणाला वाटणार नाही. बहुसंख्य नागपूरकरांना विशेषतः नव्या पिढीला हा किल्ला नेमका कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हेही दुर्दैवाने माहीत नाही.

कल्याणेश्वर मंदिरापुढील रस्त्यावर एका उंच टेकडीवर हा किल्ला आहे. गोंड राजांचे वंशज आजही या किल्ल्यात राहतात. साधारणतः १७०२ मध्ये गोंड राजांनी नागपूर शहर वसविले. त्याच्या कितीतरी आधीपासून देवगडच्या गोंड राजांचे ठाणे नागपुरात होते. त्यामुळे त्यावेळीच (चार-पाचशे वर्षापूर्वी) या किल्ल्याची निर्मिती झाली आहे. किल्ल्याच्या सभोवताल पाण्याने भरलेले खंदक होते. या किल्ल्यास उत्तरेस असलेली दगडी कमान म्हणजे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर फारशी लिपीत काही मजकूर कोरला आहे. त्यात या प्रवेशद्वाराची निर्मिती कोणी व कधी केली तसेच आलेला खर्च याची माहिती दिली आहे. या द्वारातून सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य द्वार आहे. या लाकडाच्या द्वाराची जाडी सुमारे ७-८ सें.मी. असावी. हे मुख्य राजवाड्याचे द्वार आहे. येथे लाकडी स्तंभांचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्यावर गच्ची होती. आतील बाजूस संगमरवरी बांधकामाचा एक फवारा आहे.

या किल्ल्याच्या सभोवताल चार बुरुज होते. त्यापैकी फक्त एकच बुरुज अस्तित्वात आहे. या बुरुजावर मरियम नावाची तोफ आहे. प्रत्यक्ष लढाईत या तोफेचा सहभाग राहिला आहे. ही तोफ चारही बाजूंनी फिरविण्याची व्यवस्था पूर्वी होती. अन्य तीन बुरुज आणि त्यावरील तोफा युद्धात नष्ट झाल्या. काळ्या दडगांनी बांधलेल्या या किल्ल्याच्या भिंतीवर रिद्धी-सिद्धीची मूर्ती आहे. याशिवाय बुरुवाजर सापडलेली एका देवतेची मूर्ती येथे ठेवली आहे. गोंड राजांनी येथे वाचनालय सुरू केले होते. त्या वाचनालयातील पर्शियन भाषेतील काही हस्तलिखिते आजही वंशजांनी सांभाळली आहे. देवगडचे राजे बख्त बुलंद शहा यांना त्यांच्या भावानेच हुसकावून लावल्यानंतर बुलंद शहा यांनी बादशहा औरंगजेबाची मदत घेतली व आपले राज्य पुन्हा मिळविले. मात्र त्यासाठी औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारण्याची अट घातली. बख्त बुंलद यांनीही एक अट घातली की मुस्लिम धर्म स्वीकारेन पण मुस्लिमांशी रोटी व्यवहार करेन मात्र बेटी व्यवहार करणार नाही. औरंगजेबाने ती मान्य केली. पुढे बक्त बुलंद शहा यांनी आपली राजधानी देवगडवरून नागपूरच्या किल्ल्यावर हलवली. या परिसरातील छोटी गावे एकत्र करून त्यांनी नागपूर नावाचे शहर वसविले व त्या शहराला आपली राजधानी केली. बक्त बुलंद शहानंतर गादीवर आलेला त्यांचा मुलगा चाँद सुल्तान याने शहरात रस्ते, पाणी यांच्या सुविधा निर्माण केल्या. गांधीसागर किंवा जुम्मा तलाव म्हणून ओळखला जाणारा शु्क्रवारी तलाव ही चाँद सुल्तानचीच निर्मिती. याशिवाय महालातील आजचे गांधी गेटही चाँद सुल्तानने उभारले. पूर्वी ते जुम्मा दरवाजा म्हणून ओळखले जायचे. गोंड राजांचे विशेष म्हणजे त्यांनी व्यापार- उद्योगासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी आणून येथे वसविले. त्यामुळे व्यापार उदिमात वाढ झाली. नागपूर शहरातील सर्वात पहिले बांधकाम असलेल्या या किल्ल्यावर आज अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. नागपूरचा अभिमान असलेला हा किल्ला जपण्यासाठी साऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

प्रशासन उदासीन हा वारसा जपला पाहिजे अशी आमचीही मनापासून इच्छा आहे. गोंड राजांचा इतिहास लोकांना माहीत व्हावा म्हणून किल्ला परिसरात एक म्युझियम बांधण्याचा विचार आहे. याशिवाय प्रशासनावर अवलंबून न राहता आम्हीच स्वखर्चाने या परिसराच्या सौंदर्यीकरणाचे कार्य सुरू केले आहे. - राजे विरेंद्र शहा बख्त बुलंद शहा यांचे वंशज

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष किल्ल्यावरील बुरुज व त्यावरील तोफ यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे आपण स्वतः पुरातत्त्व विभागाला पत्र देऊन या बुरुजाच्या देखभालीची विनंती केली. मात्र आश्वासनापलीकडे काही झाले नाही हे दुर्दैवी आहे. - उमेशबाबू चौबे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 7th, 2013, 04:59 PM   #54
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 7th, 2013, 05:07 PM   #55
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 9th, 2013, 09:24 AM   #56
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 11th, 2013, 06:09 PM   #57
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 18th, 2013, 11:47 AM   #58
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 19th, 2013, 05:12 PM   #59
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Old August 24th, 2013, 10:11 AM   #60
radioactive
Registered User
 
Join Date: Sep 2011
Posts: 434
Likes (Received): 56

radioactive no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 


Reply

Thread Tools

Posting Rules
You may not post new threads
You may not post replies
You may not post attachments
You may not edit your posts

BB code is On
Smilies are On
[IMG] code is On
HTML code is OffAll times are GMT +2. The time now is 11:38 PM.


Powered by vBulletin® Version 3.8.11 Beta 4
Copyright ©2000 - 2019, vBulletin Solutions Inc.
vBulletin Security provided by vBSecurity v2.2.2 (Pro) - vBulletin Mods & Addons Copyright © 2019 DragonByte Technologies Ltd.
Feedback Buttons provided by Advanced Post Thanks / Like (Pro) - vBulletin Mods & Addons Copyright © 2019 DragonByte Technologies Ltd.

SkyscraperCity ☆ In Urbanity We trust ☆ about us